श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची दीव्य परंपरा लाभलेल्या वारकरी सांप्रदायाच पविश्री संत ज्ञानेश्वर महाराजांची दीव्य परंपरा लाभलेल्या वारकरी सांप्रदायाच पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र आळंदी (देवाची) येथे वारकरी सांप्रदायाची सेवा करणाऱ्या अनेक संस्थांपैकी एक महत्वाची संस्था म्हणजे देविदास धर्मशाळा तथा वै .मामासाहेब दांडेकर स्मृती मंदीर . हि संस्था वारकऱ्यांच्या सेवेकरिता सन -१९१९ साली स्थापन झाली . या धर्मशाळेला अनेक संताच्या वास्तव्याने दिव्यत्व प्राप्त झाले . त्यांच्या आशिर्वादाने वै . साधहृदय नानासाहेब कोठेकर यांनी अनेक वारकरी कीर्तनकार घडवले . आणि सर्व समाजाला एकत्रित करून एक भव्य अशी वास्तुनिर्माण करून येणाऱ्या वारकरी भक्तांना अत्यंत दरात व्यवस्था केली.
पंढरपूरच्या महिन्याच्या वारकऱ्यांना अन्नदान , वस्त्रदान या परंपरा अखंडित पणे चालू आहे धर्मशाळेमध्ये वै . मृदंगमहर्षी पांडुरंग महाराज वैद्य , वै . भाऊसाहेब महाराज व्र्होलीकर रामचंद्र महाराज नागपुरकर ,वै. रामचंद्र बाबा बोधे , गु.रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक , श्वायाचार्य नामदेव म . शास्री (भगवान गड )यासारख्या मोठ्या संताच वास्तव्य लाभल. आळंदी देविदास धर्मशाळेमध्ये १०० वारकरी विद्यार्थी मोफत वास्तव्यास आहेत . सध्या वै . नानासाहेबांचे उत्तराधिकारी ह . म .प श्री निरंजन शास्त्री कोठेकर हि परंपरा अखंडितपणे सांभाळीत आहेत.
या दिव्य कार्याला आपल्या सारख्या दानशुर दात्यांचे तन, मन धनाने सहकार्यांची गरज आहे जेणे करून हे कार्य अखंडित पणे चालु राहील तरी सर्वानी. सढळ हाताने धर्मशाळेला दान करावे .